Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्य सरकारचे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश, मुंबई वगळात राज्यात 4 सदस्ययी प्रभाग रचना

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
राज्य सरकारचे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश, मुंबई वगळात राज्यात 4 सदस्ययी प्रभाग रचना
       

मुंबई – महानगरपालिका निवडणुकांची लगबग सुरु होणार आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे महापालिकेंना दिले आहेत. या निवडणूकांमध्ये मुंबई येथे एक सदस्यीय प्रभाग रचना असणार आहेत तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभागांना प्राधान्य असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर नगर विकास विभागाने राज्यामधील महापालिकेंच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले.

राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या आहेत. प्रभाग रचना आदेशामुळे या निवडणूका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिल्याने स्थानिक नेत आणि कार्यकर्त्यांची आशा पल्लवीत झाल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहेत. मात्र आता आगामी काळात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रभाग रचना करण्याचा आदेश सरकारने दिले असल्याचे नगरविकास विभागाने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक जुन्याच प्रभागानुसार होणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.


       
Tags: 4-memberElectionsexcludinggovernmentmumbaimunicipalorderspreparestatestructureVanchit Bahujan Aaghadiward
Previous Post

आयसीसीच्या हॅाल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनीचा समावेश

Next Post

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

Next Post
राज्यात देशी विदेशी मद्य महाग,  किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
बातमी

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

by mosami kewat
September 6, 2025
0

लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...

Read moreDetails
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर

September 6, 2025
अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

September 5, 2025
वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

September 5, 2025
जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा  इशारा

जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home