Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 12, 2025
in बातमी
0
राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार
       
मुंबई – राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आक्टोंबर नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नुकतेच राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूकांसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निवडणूक प्रभाग रचना, मतदार याद्या अद्यावत करणे आणि इतर निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसाठी महापालिकांना साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका या आक्टोंबर नंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्णय घेतला आहे. त्यानूसार महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना करण्यात येणार आहेत. राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 महिन्यांच्या कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत. ज्यातील नगरपरिषद आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया 7 टप्प्यांमध्ये राबवली जाते. या प्रक्रियेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतर आक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: 3 monthsElectionsformationmunicipalOctoberstatetakewardwill
Previous Post

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

Next Post

एअर इंडिया बोईंग 787 अपघात : अहमदाबादमध्ये मोठी हवाई दुर्घटना, 254 जण होते प्रवासात

Next Post
एअर इंडिया बोईंग 787 अपघात : अहमदाबादमध्ये मोठी हवाई दुर्घटना, 254 जण होते प्रवासात

एअर इंडिया बोईंग 787 अपघात : अहमदाबादमध्ये मोठी हवाई दुर्घटना, 254 जण होते प्रवासात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !
बातमी

अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

by mosami kewat
September 5, 2025
0

अमोल मिटकरी यांचे UPSC ला पत्र ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी अरेरावी केली, हा...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

September 5, 2025
जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा  इशारा

जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2025
वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

September 5, 2025
Giorgio Armani Died : इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे 91 व्या वर्षी निधन‎‎

Giorgio Armani Died : इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे 91 व्या वर्षी निधन‎‎

September 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home