Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 6, 2025
in बातमी
0
मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
       

पुणे – मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि संघाला प्रश्न विचारायला पाहिजेत असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करत भारत पाक युद्वाबाबत अनेक प्रश्न पुणे येथे पत्रकारपरिषदेत उपस्थित केले. मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही याचे कारणे सरकारने मांडली पाहिजेत. भारताच आंतराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावे म्हणून अनेक देशांनी भारताला कोणीही उघड पाठिंबा दिला नाही. खर संकट हे युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थीती आहे. त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत .

परवा आर्मी प्रमुख अनिल चव्हाण पुण्यात येवून गेले. त्यांनी भारताची विमाने पाकिस्तानने पाडली असे कबुल केले. तसेच पाकिस्तानने भारताचे नुकसान देखील केल्याचेही कबुल केले. मात्र दुसरिकडे मोदी देशाला खोटी माहिती देत आहेत असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोदींनी कबुल केले आम्ही पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. मात्र पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती पुरवणाऱ्यांची माहीती मोदी देशाला देणार काय असे त्यांनी विचारले. हा गंभिर प्रश्न असून इथल्या राजकिय पक्षांनी व जनतेने पंतप्रधान आणि आरएसएस ला प्रश्न विचारले पाहिजेत. संघ व भाजपची जवळची माणसं भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत आहेत. त्याबाबत मोदी व भाजप संघाला लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

रशियाचे युद्ध सामुग्री, साहित्य आपल्याकडे आहे. मात्र रशियाने युद्धानंतर पाकिस्तानला मदत केली आहे. तर दुसरिकडे फ्रान्स ही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. भारत पाक युद्धात भारतीय सैनिकांनी जिंकलेली बाजू मोदींच्या धोरणांमुळे आपण हारलो. पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळी आपण हारतोय का याचा खूलासा मोदींनी करावा. मोदींसाठी भारतीय जनतेचा दबाव म्हत्वाचा की, अमेरिकेच्या ट्रम्पचा दबाव म्हत्वाचा होता ते सांगाव. अमेरिकेच्या दबावाखाली भारताने माघार घेतली आहे.

गल्लीतल्या मारामारीत देखील जो अग्रेसीव आहे तो जिंकतो. भारताने माघार घेतली म्हणून तुम्ही गांडूगिरी केली. भारताने माघार घेतल्यानंतर दोन दिवसांनी तिन्ही सैन्य दलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे, पाकिस्तानात दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एकूण 91 ट्रेनिंग सेंटर आहेत. मात्र त्यातील भारताने केवळ 9 ट्रेनिंग सेंटर उडवली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सगळी दहशतवादी ट्रेनिंग सेंटर संपवल्याशिवाय दहशतवाद पुर्ण संपनार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारत जिंकण्याच्या परिस्थितीत होता. एअरफोर्स, आर्मीला तुम्ही बॉर्डरवर घेवून गेलात. यावेळी भारताला 1990 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी आतंकवादाला संपवण्याची संधी होती. मात्र ती आपण का गमावली असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तान पुन्हा दहशतवाद करणार नाही असे वदवून का घेतले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांनी भाजपला, मोदींना व संघाला प्रश्न विचारले पाहिजेत. पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी का गमावली, माघार का घेतली याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: Adv. Prakash Ambedkarbutcountriescountryindiamanymodinotsinglestoodvisited
Previous Post

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

Next Post

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

Next Post
रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎UPI व्यवहारांसाठी १ ऑगस्टपासून नवीन नियम: मर्यादा, वेळेचे बंधन आणि बरेच काही!
बातमी

‎UPI व्यवहारांसाठी १ ऑगस्टपासून नवीन नियम: मर्यादा, वेळेचे बंधन आणि बरेच काही!

by mosami kewat
July 28, 2025
0

डिजिटल व्यवहारांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवीन नियम लागू होतील, ज्यामुळे...

Read moreDetails
कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर

कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर

July 28, 2025
‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने फेक टेलिग्राम अकाउंटवरून हॅकिंगचा धोका: आंबेडकरांचा सतर्कतेचा इशारा

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने फेक टेलिग्राम अकाउंट, हॅकिंगचा धोका: आंबेडकरांचा सतर्कतेचा इशारा

July 28, 2025
वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

July 28, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा

जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home