Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
       
नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १४६.३९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामुळे भारत चीनला मागे टाकणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एकूण प्रजनन दरात घट झाल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) आता १.९ इतका झाला आहे. हा दर २.१ च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक पिढीतील लोकसंख्या पूर्वीइतकी पुनरुत्पन्न होत नसून, भविष्यात लोकसंख्यावाढीचा वेग मंदावत जाणार आहे.

या अहवालातील महत्त्वाचे मुद्दानूसार भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये १४६.३९ कोटींवर पोहोचेल. एकूण प्रजनन दर २.१ च्या तुलनेत कमी होऊन १.९ झाला आहे. भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचू शकते, त्यानंतर ती घटण्याची शक्यता आहे.

जनसांख्यिकीय संक्रमणाचा टप्पा ही आकडेवारी सूचित करते की, भारत आता जनसांख्यिकीय संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच, मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही घटत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो आहे. या परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या धोरणांमध्ये बदल घडवणे गरजेचे ठरणार आहे.

Tags: 2025becomecountryindiamostpopulousUN report
Previous Post

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

Next Post

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

Next Post
बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद - राहुल द्रविड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
बातमी

दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

by mosami kewat
October 25, 2025
0

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...

Read moreDetails
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

ऐतिहासिक मोर्चा – निर्भीड नेतृत्व

October 25, 2025
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

October 24, 2025
आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार दिला; डीसीपींनी स्वीकारले

आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार दिला; डीसीपींनी स्वीकारले

October 24, 2025
औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग; पोलिस-कार्यकर्ते आमनेसामने

औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग; पोलिस-कार्यकर्ते आमनेसामने

October 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home