मुंबई – अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना आर्मी डे च्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. लवकरच मुनीर अमेरिकेत जाणार असू्न त्यांनी अमेरिकेचे आमंत्रण स्विकारले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान व भारताचे संबंध बिघडलेले असून दोन्ही देशांमध्ये सध्या तनाव आहे. या पार्शभुमिवर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने निमंत्रित केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पाकिस्तानच्या जवळकती बाबतीत भारतात चिंता व्यक्त केली जात आहे.
येत्या 14 जून रोजी अमेरिकेत अमेरिकेचा आर्मी डे साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी अमेरिका करत असतो. या वर्षी देखील तो 14 जून साजरा केला जाणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना आमंत्रित केले आहे.
असीम मुनीर 12 तारखेला अमेरिकेत जाणार असू 14 तारखेला अमेरिकेच्या आर्मी डेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 12 जून ते 14 जून या काळात असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार यावर सर्वांचे लक्ष असनार आहे. पाकिस्तानी दहशतवाद, भारत पाकिस्तानमधील तनाव, चिन सोबतचे पाकिस्तानचे संबध यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.