सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, असे धान्य देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे,नगरसेवक गणेश पुजारी, नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष मोहन जमदाडे, बबन शिंदे, राम माने, अनिरुद्ध वाघमारे उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...
Read moreDetails