Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

Akash Shelar by Akash Shelar
November 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
       

मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाने १७ नोव्हेंबर रोजी ५ हजार ४५३ झोपड्यांवर कारवाई करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हजारो झोपडपट्टीधारकांच्या घरांवर बेघर होण्याचे संकट निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ॲड. आंबेडकरांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान रेल्वेमंत्र्यांशीही दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंबईतील रेल्वेच्या जमिनींसंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. तसेच, १७ नोव्हेंबर रोजी होणारी झोपड्यांवरील कारवाईही स्थगित करण्यात आली आहे.

झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काची घरे मिळेपर्यंत त्यांच्या सध्याच्या घरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करत हा निर्णय मुंबईतील हजारो झोपडपट्टीधारकांचा विजय असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना मिळालेली ही स्थगिती संबंधित रहिवाशांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.


       
Tags: Eknath ShindeMaharashtraPrakash AmbedkarRAIL MINISTERSRA officeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

by Akash Shelar
November 5, 2026
0

मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे....

Read moreDetails
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home