Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा

mosami kewat by mosami kewat
January 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अमरावतीत वंचितची तोफ कडाडणार! युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज जाहीर सभा
       

अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर आहेत. शहरातील विविध भागांत सुजात आंबेडकर यांच्या प्रचार सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुजात आंबेडकर यांच्या जाहीर सभेत मोठी राजकीय समीकरणे बदलण्याची 

शक्यता आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा जोरदार प्रचार सुरू असून सुजात आंबेडकर यांची आज तोफ कडाडणार आहे. 

आज सायंकाळी ६ वाजता नवी वस्ती बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सुजात आंबेडकर मार्गदर्शन करणार असून, महानगरपालिकेतील प्रश्न, विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार आहेत.

यानंतर सायंकाळी ७.३० वाजता प्रभाग क्रमांक १०, फ्रेजरपुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग देण्यात येणार आहे.

दौऱ्याच्या शेवटी सायंकाळी ८ वाजता राहुल नगर, बिच्छू टेकडी येथील समाज मंदिराजवळ आणखी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेलाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात युवा नेते सुजात आंबेडकर येणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सुजात आंबेडकर यांच्या या दौऱ्यामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


       
Tags: amravatiAmravati developmentAmravati Maharashtra electiondevelopmentElectionElection newsMaharashtra electionpoliticsSujat Ambedkarvote
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत रणसंग्राम प्रचार दौरा; घाटकोपर ते वडाळा ५ ठिकाणी होणार जाहीर सभा

Next Post

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

Next Post
बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर 'वंचित'चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?
बातमी

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

by mosami kewat
March 10, 2026
0

पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल...

Read moreDetails
​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

March 10, 2026
अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

March 10, 2026
अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

March 9, 2026
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

March 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home