Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in अर्थ विषयक
0
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

       

– संजीव चांदोरकर

वरून पडणारे चाकू किंवा तलवारी पकडण्याचा प्रयत्न करू नये…. शेअर बाजारातील शहाणपण !

सेन्सेक्स आणि शेयर मार्केट…. मध्यपूर्वेतील परिस्थिती मुळे, नर्व्हसनेस मुळे अजून खाली जात आहे. कोणी ग्रेट ज्योतिषी देखील नक्की काय होईल ते सांगू शकतं नाही.

आज आता लिहिताना सेन्सेक्स ११५० अंकांनी खाली…७२,४३० आहे.

५२ आठवड्याचा नीचांक ७१,४२५ होता. त्याच्या फक्त एक हजार अंकाने दूर. त्याच्या जवळपास सरकत आहे.

फायनान्शियाल सल्लागार/ ब्रोकर्स अनेक सल्ले देतील. टेक्निकल ऍनॅलिसिस सांगतील. मार्केट बॉटमला आहे. यानंतर ते वरच जाणार आहे. अनेक शेअर्सचे अतिशय आकर्षक बाजारभाव आहेत. तुम्ही तर चडफडत होतात तो शेयर विकत घेण्यासाठी. हा तर ५२ आठवड्याच्या निचांकाच्या जवळ आहे.

सगळ्यांचे ऐका. पण निर्णय घेण्याआधी मनाचे ऐका.

आपण किती नुकसान सहन करू शकतो याचा कागदावर हिशोब करा.

समजा मार्केट उलटे फिरले आणि तुम्ही खालच्या बाजारभावाची बस मिस केली. कोणी मरत नाही. बसेस सतत येत असतात. काही काळाने जास्त भावात शेयर खरेदी केलात तर काय होईल? कमी भांडवली नफा होईल. एवढेच.

नफा/ रिटर्न आणि जोखीम/ रिस्क…या दोन्हीवर एकाचवेळी दोन्ही डोळ्यांची बुबुळे लावून ठेवा. यात एकाचवेळी हा शब्द महत्वाचा. नजर हटी, दुर्घटना घटी.

दिसेल त्याला सारख्या सारख्या टिप्स विचारू नका. संबंधितांकडून कोणत्या टिप्स मार्केटमध्ये फिरतील हे बघितले जाते. साधे नाही ते प्रकरण. त्यांना विकायचे असतात. म्हणून त्यांना खरेदी करणारे हवे असतात.

शेयर बाजारात गुंतवलेले मुद्दल देखील कधीकधी जाऊ शकते. मान्य. पण मुद्दल कमीतकमी उडून जाईल अशी किमान सजग स्ट्रॅटेजी तरी हवी.

काही काळ कॅश घेऊन बसलात तर काही सेबी शिक्षा करत नाही. कॅशवर शांतपणे बसायला शिकले पाहिजे. कॅश सारखी आपल्याला ढुशी मारत राहते “मला बसून कंटाळा आलाय. मला एकदाचा गुंतव” त्याला बळी पडू नका.

दुसरी स्ट्रॅटेजी. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका. शेयर कितीही आकर्षक वाटला तरी गुंतवणुक जास्त कंपन्यांच्या शेयर मध्ये करा. जोखीम विखरून टाका.

हे सल्लागार, ब्रोकर पहाटेपासून स्क्रीनवर खिळून असतात. तुम्ही नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळून गुंतवणूक करता. हा मूलभूत फरक लक्षात ठेवा.

जास्तीत जास्त नफा कमावण्याची स्पर्धा कोणाशीही खेळू नका.

आपल्या कष्टाने, घामाने कमावलेल्या बचती…सर्वात मूल्यवान असतात. स्वतःच्या मुलांची काळजी घ्याल तेवढी स्वतःच्या बचतींची काळजी घ्या..


       
Tags: bear market strategyequity market downturnglobal market impact India stocksMiddle East crisis stock marketSensex crash reasonsstock market correction India
Previous Post

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

Next Post

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

Next Post
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक - अंजलीताई आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home