नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा मा उर्मिला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री मुक्ती दिन परिषद संपन्न झाली.
बहुजनांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा दिवस याच दिवशी १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृती या मानवताविरोधी ग्रंथाची सार्वजनिक होळी केली. हा दिवस स्त्री मुक्ती दिवस म्हणूनही साजरा केला जातो कारण हा ग्रंथ जाळून राख केल्याने स्त्रीविरोधी लिखाने जे स्त्री ला गुलाम ठरवित होते त्या विधानांची सुद्धा राख झाली.अर्थात स्त्री मुक्त झाली काल दिनांक २५ डिसेंबर रोजी मनुस्मृति दहन दिन स्त्री मुक्ती दिन मेळावा संपन्न झाला.
यावेळी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या प्रतिज्ञा दाभाडे, महिला हक्क संरक्षण समितीच्या छाया जाधव, विधीज्ञ स्वाती वाहुळ, मुख्याध्यापिका थोरात आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडला मनुस्मृती हा स्त्री शूद्र ,अति शूद्र विरोधी ग्रंथ जाळून स्त्रीला या गुलामीतून मुक्त केले. २५ डिसेंबर या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व पुढील पिढ्यांना समजावून देण्यासाठी,२५ डिसेंबर हा स्त्री मुक्ती दिन शासनाने जाहीर करावा अशी मागणी घेऊन भारिप बहूजन महासंघाने १९९७ पासून केले स्त्री मुक्ती परिषदांचे आयोजन ही केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या स्त्री मुक्ती परिषदेस, वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड प्रतिभा पानपाटील, शोभा मोरे, सोनल गायकवाड,नीतू सोनकांबळे, मीना उबाळे, सविता पवार, रंजना साबळे,उषा गांगुर्डे, शीलाताई गांगुर्डे, लक्ष्मी गांगुर्डे, उषा पगारे, सुरेखा बर्वे, अनिता दिवे, सरला दिवे, जयाबाई अहिरे, ईर्षाताई खरात,सुरेखा बर्वे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सदस्य, चेतन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावटे, सम्यक विदयार्थी अध्यक्ष, मिहिर गजभिये, महाराष्ट्र समाज भुषण बाळासाहेब शिंदे, नाशिक तालुका निरीक्षक, बाळासाहेब जाधव, राजू गोतिस, दिलीप खरात,महेश भोसले, यशवंत शिंदे, जितेश साळवे, संजय भोसले, मोरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.