पुणे : पुण्याच्या धनकवडी भागात पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या एका ढोंगी ज्योतिषाने एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरु (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १२ जुलै रोजी तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार आपल्या भावाची पत्रिका घेऊन आरोपी ज्योतिषाकडे गेली होती. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने भावासाठी एक ‘विशेष वनस्पती’ आणण्यास सांगितले.
१८ जुलै रोजी ज्योतिषाने तरुणीला दुसऱ्या दिवशी ती वनस्पती घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार, १९ जुलै रोजी तरुणी त्याच्या कार्यालयात गेली असता, आरोपीने ती वनस्पती डोक्यावर ठेवून मंत्रोच्चार करावे लागतील, असे सांगितले. त्याच क्षणी तरुणीला संशय आला आणि तिने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी अखिलेश राजगुरुने तिला मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
या धक्कादायक घटनेनंतर तरुणीने तात्काळ आपल्या भावाला फोन करून माहिती दिली आणि सहकारनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली.
प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!
वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक दिवंगत सुनील जगताप यांची कन्या! अकोला : राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले....
Read moreDetails





