Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धक्कादायक! भविष्य सांगतो म्हणून भोंदू बाबाने केला तरुणीचा विनयभंग

mosami kewat by mosami kewat
July 20, 2025
in बातमी
0
धक्कादायक! भविष्य सांगतो म्हणून भोंदू बाबाने केला तरुणीचा विनयभंग

धक्कादायक! भविष्य सांगतो म्हणून भोंदू बाबाने केला तरुणीचा विनयभंग

       

पुणे : पुण्याच्या धनकवडी भागात पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या एका ढोंगी ज्योतिषाने एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरु (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १२ जुलै रोजी तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार आपल्या भावाची पत्रिका घेऊन आरोपी ज्योतिषाकडे गेली होती. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने भावासाठी एक ‘विशेष वनस्पती’ आणण्यास सांगितले.
‎
‎१८ जुलै रोजी ज्योतिषाने तरुणीला दुसऱ्या दिवशी ती वनस्पती घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार, १९ जुलै रोजी तरुणी त्याच्या कार्यालयात गेली असता, आरोपीने ती वनस्पती डोक्यावर ठेवून मंत्रोच्चार करावे लागतील, असे सांगितले. त्याच क्षणी तरुणीला संशय आला आणि तिने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी अखिलेश राजगुरुने तिला मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
‎
‎या धक्कादायक घटनेनंतर तरुणीने तात्काळ आपल्या भावाला फोन करून माहिती दिली आणि सहकारनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली.


       
Tags: AstrologerDhankawadipunewoman
Previous Post

कुरेशी समाजाचे लातूरमध्ये आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Next Post

‎पुणे जिल्ह्यात जलसाठवणूक प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग सुरू: ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा तिसरा टप्पा लवकरच

Next Post
‎पुणे जिल्ह्यात जलसाठवणूक प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग सुरू: 'जलयुक्त शिवार' योजनेचा तिसरा टप्पा लवकरच

‎पुणे जिल्ह्यात जलसाठवणूक प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग सुरू: 'जलयुक्त शिवार' योजनेचा तिसरा टप्पा लवकरच

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर
बातमी

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
October 22, 2026
0

अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home