मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन दिवस आधी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. सर्व बँकांमधून नोटा जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. एका वेळी एक व्यक्ती १० नोटा म्हणजे वीस हजार रुपये जमा करू शकतो असे रिझर्व बँकेने जाहीर केले आहे. या निर्णयावर अनेक जाणकारांनी आपले वेग वेगळे मत व्यक्त केले आहे. भाजप सरकारच्या कार्य काळात हि दुसऱ्यांदा नोट बंदी आहे. पहिल्या नोट बंदीच्या काळात जनतेचे खूप हाल झाले. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्या वेळेस सुध्दा १००० रुपयांच्या नोटा या चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. आणि २०००
रुपयांच्या नोटा चलनात आल्या त्याचा फायदा आता पर्यत होत होता का? तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय आर्थिक दृष्ट्या योग्य आहे का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. २०१६ चा निर्णय हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केला होता, पण काळा पैसा काही बाहेर आला नाही.
या सर्व परिस्थितीवर विधान करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फार मोठे व तेवढेच महत्वाचे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की २०००च्या नोटा बंद करणे म्हणजे भाजपचे चोकिंग राजकारण आहे. भाजप चोकिंग राजकारण करत आहे. विरोधकांना निधी मिळू नये आणि त्याच्याच बरोबर विरोधकांकडे निधी येऊ नये या दृष्टीने टाकलेला भाजपचा खेळ आहे. निवडणुकीच्या दृष्टीने खेळलेले राजकारण आहे.
येणाऱ्या ऑक्टोबर, नोहेंबर मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे असे भाकीत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच इतर राजकीय पक्षांना गाफील राहू नये असा सल्ला देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.