मुंबई : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जिथे प्रत्येक गोष्ट शुद्ध मिळण्याचे आश्वासन दिले जाते, तिथे शुद्ध दूध मिळवणे आता सर्वसामान्यांसाठी एका मोठ्या संघर्षासारखे झाले आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध माफियांचा काळा धंदा जोमाने फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गोरखधंदा थेट लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या जिवाशी खेळत असून प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. (Adulterated Milk Racket)
असे तयार होतेय ‘पांढरं विष’
मिळालेल्या माहितीनुसार, निव्वळ नफा कमावण्यासाठी हे माफिया दुधामध्ये अत्यंत घातक पदार्थांचे मिश्रण करतात. यामध्ये प्रामुख्याने खालील पदार्थांचा समावेश असतो:
डिटर्जंट पावडर आणि साबणाचे द्रावण, युरिया आणि सिंथेटिक केमिकल्स रिफाईंड तेल एक लिटर शुद्ध दुधात या घातक वस्तू आणि पाणी मिसळून त्याचे दोन लिटर दूध केले जाते. हेच ‘विषारी’ दूध रोज सकाळी हजारो घरांमध्ये पोहोचवले जात आहे. हे भेसळयुक्त जीवघेणा पदार्थ तयार करतानाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. (Adulterated Milk Racket)
या रॅकेटचा खुलासा करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. नामांकित कंपन्यांचे दूध सेंटरवरून थेट ग्राहकांकडे न जाता, ते आधी माफियांच्या छुप्या अड्ड्यांवर नेले जाते. तिथे मूळ पिशवी अत्यंत शिताफीने फोडली जाते, त्यातील दूध काढून त्यात भेसळ केली जाते आणि पुन्हा मशीनच्या सहाय्याने नव्या पिशव्या सील करून बाजारात पुरवल्या जातात
https://x.com/eprabuddhbharat/status/2004813003653304635?s=20
आरोग्यावर जीवघेणे परिणाम
भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याचे दीर्घकालीन परिणाम म्हणजे किडनी आणि लिव्हर निकामी होणे आणि लिव्हर डॅमेज होण्याचा मोठा धोका आहे. तसेच वाढत्या वयातील मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटत आहे.
महिलांमध्ये कॅल्शियमची प्रचंड कमतरता निर्माण होत आहे. यासोबतच इतर आजार देखील उद्भवते यामध्ये पोट, त्वचा आणि डोळ्यांचे गंभीर विकार होत आहेत. दीर्घकाळ हे दूध प्यायल्याने मानवी शरीर आतून पूर्णपणे पोखरले जाते,” असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. (Adulterated Milk Racket)
प्रशासनाकडून कारवाईची मागणी
कपासवाडीतील या उघड माथ्यावर सुरू असलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “मुलांच्या दुधाच्या पेल्यात माफिया विष कालवत आहेत, तरीही अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलीस गप्प का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.





