Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎मोदीजी, हा कसला मित्र? प्रकाश आंबेडकरांची ट्रम्प-मोदी मैत्रीवर सडकून टीका

mosami kewat by mosami kewat
July 31, 2025
in बातमी
0
‎मोदीजी, हा कसला मित्र? प्रकाश आंबेडकरांचा ट्रम्प-मोदी मैत्रीवर सडकून टीका

‎मोदीजी, हा कसला मित्र? प्रकाश आंबेडकरांचा ट्रम्प-मोदी मैत्रीवर सडकून टीका

       

‎
‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या त्यांच्या कथित मैत्रीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ट्रम्प भारताला ‘मित्र’ म्हणत असतानाही, त्यांची धोरणे मात्र भारतासाठी हानिकारक ठरत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
‎
‎जून महिन्यात मोदींनी ट्रम्प यांना भारतासमोर मित्र संबोधले होते. याच संदर्भाला धरून ‎ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे, मोदीजी, तुमचा हा कोणता मित्र आहे? त्यांनी ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या भूमिकेवर आणि पाकिस्तानसोबतच्या वाढत्या जवळीकीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.
‎
‎ॲड. प्रकाश आंबेडकरांनी यांनी टीका करताना म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% रेसिप्रोकल टॅक्स लावला आहे. तसेच, भारताने रशियाकडून लष्करी उपकरणे खरेदी केल्यास दंड आकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिका भारताला स्पष्टपणे चेतावणी देत आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच चालावे, असे आंबेडकर म्हणाले. यातून अमेरिकेची भारताकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
‎
‎दुसरीकडे, अमेरिका पाकिस्तानसोबत जवळीक वाढवत असल्याचेही आंबेडकरांनी निदर्शनास आणले आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत संयुक्तपणे तेल साठे विकसित करण्यासाठी एका तेल व्यापार कराराची घोषणा केली आहे, यावर त्यांनी भर दिला.
‎
‎या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी मोदींना थेट प्रश्न विचारला आहे, मोदीजी, तुमचा हा कोणता मित्र आहे? हे तर शत्रूसारखे काम करत आहेत!” त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, तुमची ट्रम्पसोबतची मैत्री संपूर्ण भारताला महागात पडत आहे!
‎
‎ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फसवणूक करणारा मित्र आणि अयशस्वी परराष्ट्र धोरण हीच मोदींची उपलब्धी! अशा शब्दांत जोरदार टीका केली आहे.


       
Tags: Donald TrumpForeign policynarendra modiPrakash Ambedkar
Previous Post

धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या

Next Post

रशियन विमान कंपनीवर मोठा सायबर हल्ला; सेवासुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागू शकते

Next Post
रशियन विमान कंपनीवर मोठा सायबर हल्ला; सेवासुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागू शकते

रशियन विमान कंपनीवर मोठा सायबर हल्ला; सेवासुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागू शकते

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'वंचित बहुजन आघाडी'ची नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक; 'प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित' - चेतन गांगुर्डे
बातमी

‘वंचित बहुजन आघाडी’ची नाशिकमध्ये नियोजन आढावा बैठक; ‘प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित’ – चेतन गांगुर्डे

by mosami kewat
October 31, 2025
0

नाशिक : नाशिकमधील प्रबुद्ध नगर येथे 'वंचित बहुजन आघाडी'ची नियोजन आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी...

Read moreDetails
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home