महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. बऱ्याच ठिकाणी सकाळी मतदानाला सकाळी 7: 30 वाजतापासून सुरुवात झाली. सांयकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. निवडणुकांची मतमोजणी दुसराच दिवशी म्हणजेच बुधवारी होणार आहे.असा सगळा नियोजन असूनदेखील राज्यातील मतदान केंद्रावर सावळा कारभार बघायला मिळत आहे.
बऱ्याच ठिकाणी मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्याचे बघायला मिळाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद येथील नेताजी प्राशाळेत EVM bad बंद पडले होते. तांत्रिक बिघाड झाल्याने कारण सांगण्यात आले. मोहोळ नगरपरिषद येथे EVM अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बंद होते.
कर्मचाऱ्याकडून मतदान मशीन सुरु करण्याचे प्रयत्न होते. मात्र, या सर्व तांत्रिक विधानामुळे याचा फटका मतदारांना सहन करावा लागत आहे. बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक 8 येथील मतदान केंद्र क्रमांक आठ आणि दोनमध्ये मशीनमध्ये बिघाड झाल्याने येथे देखील अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मतदान ठप्प झालं होते.तरदुसरीकडे चिपळूण मध्ये देखील EVM मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबलेत.
खंड मतदान केंद्रावरील EVM मशीन दोन वेळा बंद पडले आहेत. आता प्रशासनाकडून मशीन सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. मात्र मतदार रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत आहे.






