Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई

mosami kewat by mosami kewat
July 26, 2025
in बातमी
0
निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई

निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई

‎ओडिशा : ओडिशा दक्षता विभागाने कोरापूत जिल्ह्यातील जयपूर वनपरिक्षेत्रात (फॉरेस्ट रेंज) कार्यरत असलेले उपवनरक्षक (डेप्युटी रेंजर) रामचंद्र नेपाक यांच्या सहा मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. नेपाक अवघ्या पाच महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते, त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे.
‎
‎छाप्यादरम्यान, जयपूर शहरातील नेपाक यांच्या एका फ्लॅटमधील गुप्त तिजोरीत तब्बल १.४३ कोटी रुपयांची रोकड, सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची नाणी सापडली आहेत, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय, १.३२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FDs), दीड किलो सोने आणि साडेचार किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
‎नेपाक यांच्या मालकीची अनेक स्थावर मालमत्ताही उघड झाली आहे. यामध्ये जयपूरमध्ये ३६०० चौरस फुटांची तीन मजली इमारत, भुवनेश्वरमध्ये एक ३ बीएचके फ्लॅट, आणि जयपूर शहरात दोन फ्लॅट तसेच दोन भूखंड (प्लॉट) यांचा समावेश आहे.
‎
‎सध्या दक्षता विभागाकडून जप्त करण्यात आलेली रोकड, सोने, चांदी आणि इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. सोने, चांदी आणि इतर मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या मोठ्या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: goldOdishaOdisha vigilance raid
Previous Post

मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

Next Post

नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

Next Post
नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
बातमी

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

by mosami kewat
September 6, 2025
0

लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...

Read moreDetails
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर

September 6, 2025
अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

September 5, 2025
वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

September 5, 2025
जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा  इशारा

जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home