जालना : महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जालना येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून, आतषबाजी करत आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
रविवार, दिनांक 21 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा जल्लोष करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली – प्रकाश आंबेडकर
या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महिला जिल्हाध्यक्षा रमा होर्शिळ, ज्येष्ठ नेते विष्णु खरात, राज आदमाने, तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका महासचिव वैभव वानखेडे, तालुका सचिव गौतम वाघमारे यांच्यासह अरविंद होर्शिळ, मिलिंद सरकटे, संजय उघडे, संतोष मगर, अमोल लोखंडे, संकेत दांडगे, संतोष कासार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीतील हे यश बहुजन समाजाच्या राजकीय जागृतीचे द्योतक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






