महाराष्ट्र प्रवक्ते फारुख अहमद यांची मोर्चाला प्रमुख उपस्थिती
पुसद, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिम च्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी पुसद येथील उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले .
बस स्थानक परिसरातील क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक या मार्गे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देऊन पुसद करांचे लक्ष वेधले, पुसद येथील राहुल केवटे व क्रिश केवटे दुहेरी हत्याकांडातील मारेकऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, केवटे परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, परळी येथील पोलीस कस्टडीत मारल्या गेलेल्या जरीन खानला न्याय मिळालाच पाहिजे, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, होश में आओ होश में आओ पोलीस प्रशासन होश मे आओ , श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,अशा गगनभेदी घोषणांनी पुसद करांचे आजच्या मोर्चाने लक्ष वेधले. मणिपूर येथील कूकी आदिवासी समाजाच्या महिलेची नग्नधिंड काढून
आदिवासी महिलेची क्रूर चेष्टा करणाऱ्या आरोपीचा जाहीर निषेध करण्यात आला. अशा विविध मागण्याचे फलक हातात घेउन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चाला विविध जाती धर्मातील अनेक कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्या होती. ऊन ,पाऊस ,वारा यांची तमा न बाळगता, तमाम बहुजन समाजातील अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे या आशेने सर्व कार्यकर्ते घरच्या भाकरी बांधून स्वखर्चाने पुसदच्या मार्गाने निघाले होते.
या जन आक्रोश मोर्चाचा समारोप उपविभागीय कार्यालय पुसद येथे येऊन मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले.
या मोर्चाला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ता फारुख अहमद म्हणाले की,जाती व धर्माच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र संविधानाचा व सत्तेचा वापर करून असंविधानिक कृत्य करून हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार चालवल्या जात आहे. मागासवर्गीय ,आदिवासी व मुस्लिम यांना टारगेट करून त्यांच्या हत्या व खून केल्या जात आहेत.
परळी जिल्हा बीड येथील जरीन खान, बोंढार हवेली नांदेड येथील अक्षय भालेराव चा खून , पुसद येथील राहुल केवटे व क्रिस केवटे यांची निर्घृन हत्या, तसेच अमळनेर येथिल अश्फाक शेखचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होतो जाती-धर्माच्या नावाखाली निष्पाप मुस्लिमांना मारल्या जात आहे, मागासवर्गीय, आदिवासींचे दिवसाढवळ्या खून केले जात आहेत तरी सुद्धा शासन प्रशासन संवेदनशील का नाही? हा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम जिल्ह्याच्या वतीने, उपविभागीय कार्यालय पुसद येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले .
विविध मागण्यांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, कार्तिकेएन एस. यांचे मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना देण्यात आले.
या मोर्चाला राज्य प्रवक्ता, फारुख अहमद, पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील,यवतमाळ जिल्हा प्रभारी मोहन राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत, जिला महासचिव डी.के दामोधर, जिल्हा उपाध्यक्ष शामराव राठोड, भाऊराव गायकवाड, मौलाना सय्यद हुसेन , पांडुरंग मेश्राम, उत्तम ढोले,लक्ष्मण वानखेडे, सतीश उरकुडे, सुभाष सावते,नितीन धुळध्वज, विजय लहाने , ज्ञानदीप कांबळे , शेख अशपाक, रफिक शेख, पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, बीशर कुरेशी,शहराध्यक्ष जयानंद उबाळे, आनंद भगत, प्रसाद खंदारे, राजरत्न लोखंडे ,डॉअरुण राऊत,
विद्या नरवाडे, राधिका हराळ, आशाबाई तालिकोटे, छाया राठोड,अंकिता टालीकोटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व ग्रामीण शाखेपासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती.