Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वीबीएच्या पुढाकाराने अकोल्यात सुरु होणार ऑक्सिजन प्लांट

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 5, 2021
in बातमी
0
       

वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने अकोल्यात लवकरच (Pressure Swing Absorption) पीएसए  प्रणालीवर चालणारा ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा खूप मोठि आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अश्या परिस्थितीत अकोल्यात ऑक्सिजन प्लांट सुरु झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे.  

वंचितचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी हवेतून प्राणवायू वेगळा करून त्याला शुद्ध स्वरूपात रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट सुरु करावा असा प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने ऍड.आंबेडकरांचा हा प्रस्ताव मान्य केला आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन फुंडकर यांनी दिली आहे. सदर प्रस्ताव मान्य करण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी  श्री जितेंद्र पापळकर, उपजिल्ह्याधिकारी संजय खडसे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे आभार मानण्यात आले आहेत.

 
अकोला जिल्हापरिषदेत सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा जिल्हापरिषदे तर्फे ५० बेडचे कोविड सेंटर उभारून कोरोना विरुद्धच्या लढाईत स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा मोठा हातभार लावू शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे. कोविड सेंटर पाठोपाठ आता ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी पुढाकार घेऊन वंचितने जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहोत हे दाखवून दिले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे पाहून इतरही पक्षांनी अश्याच प्रकारे कोविडशी लढण्यासाठी  प्रकल्प उभे केल्यास लवकरात लवकर कोरोनावर मात करता येईल.    


       
Tags: Adv.Balasaheb AmbedkarAkolacoronacovid19oxygenoxygen plantPrakash Ambedkarvbaअकोलाकोरोनाकोविड सेन्टरकोविड-१९वंचित बहुजन आघाडीविबीए
Previous Post

कोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट! जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प!!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

Next Post
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 
बातमी

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

by mosami kewat
April 4, 2026
0

दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने...

Read moreDetails
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

April 4, 2026
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home