कोल्हापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने वंचित समाजातील युवक-युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी विशेष उद्योजकता शिबिर आयोजित केले होते. या प्रेरणादायी उपक्रमाला युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा मिळाली.
या शिबिरात सहभागींना व्यवसाय सुरू करण्याच्या विविध संधी, शासकीय योजना, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि मार्केटिंग कौशल्ये यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, शहराध्यक्ष अरुण सोनवणे, आणि महासचिव संजय गुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विश्वनाथ पाटील आणि महाबोधी पद्माकर यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. समाज परिवर्तनासाठी युवकांनी रोजगार मागण्याऐवजी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. वंचित समाजातील युवकांनी आत्मनिर्भर होण्यासाठी हे शिबिर एक टर्निंग पॉइंट ठरेल, असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
शिबिरादरम्यान अनेक यशस्वी उद्योजकांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी उपस्थित युवक-युवतींना व्यवसाय सुरू करताना कोणती पाऊले उचलावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दल मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे बहुजन समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे आयोजक डॉ. आकाश कांबळे यांनी सांगितले की, भविष्यात अशाच प्रकारच्या उपक्रमांची मालिका राबवण्यात येणार आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमित नागटीळे, तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, तालुका उपाध्यक्ष सचिन कांबळे, संविधान सन्मानचे निलेश बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, युवती अध्यक्ष ज्योती थोरात, शिवाजी परळीकर, आशिष कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर...
Read moreDetails