पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर शाखेच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात येरवडा परिसरातील अनेक उत्साही युवा कार्यकर्ते पक्षात दाखल झाले. पद्मावती येथील आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी सनी साळवे, सागर वानखेडे, स्वप्नील अल्हाट, सुमेध गायकवाड, शंतनु चव्हाण, आशिष जाधव, साहिल शिंदे यांच्यासह अन्य युवा कार्यकर्त्यांनी ‘वंचित बहुजन युवा आघाडी’त सक्रिय सहभाग घेतला. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे येरवडा भागात संघटनेला आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या पक्ष प्रवेशावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये किशोर भाऊ रिकिबे (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा), आकाश कासले (उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा) आणि धम्मपाल बनसोडे (संघटक, पुणे शहर वंचित बहुजन युवा आघाडी) यांच्या हस्ते या नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.






