Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

औरंगाबाद : दौलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरलेल्या तृतीयपंथी उमेदवार खुशबू शेख यांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा काल (दि. ४ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. या सभेत तरुणांची मोठी उपस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने खुलताबाद परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी हा देशातील एकमेव असा पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम करत आहे. ज्यांना आजवर मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले, अशा दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, मुस्लिम, महिला आणि तृतीयपंथी समाजाला संधी देऊन सत्तेत सहभागी करून घेणे, हेच पक्षाचे मुख्य ध्येय आहे. (sujat ambedkar)

तृतीयपंथी समाजातील खुशबू शेख यांना उमेदवारी देऊन वंचितने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केल्याचे सुजात आंबेडकरांनी आवर्जून सांगितले. स्थानिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी नागरिकांनी या परिवर्तनाच्या लढ्यात खुशबू शेख यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (sujat ambedkar)

यावेळी या जाहीर सभेत अमित भुईगळ (राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक), करुणा मेघानंद जाधव (नगरसेविका), ॲड. पंकज बनसोडे (औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष), याशिवाय सभेला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. खुशबू शेख यांच्या या उमेदवारीमुळे दौलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Tags: AurangabadNewsBahujanPoliticsDaulatabadGrassrootsPoliticsInclusivePoliticsKhultabadKhushbooSheikhPanchayatSamitiElectionsPoliticalRallySocialJusticesujatambedkarTransgenderCandidatevanchitbahujanaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home