Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
March 16, 2026
in बातमी, राजकीय
0
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन
       

नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तपासातील कथित निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

१३ फेब्रुवारी २०२६ रोजी कळमनुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी राजू कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेला जवळपास एक महिना उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच तपासात हिंगोली पोलिस प्रशासनाकडून गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

हल्लेखोर ज्या वाहनातून आले होते त्या वाहनाचा मागोवा घेणे, शहरातील सीसीटीव्ही तपासणे आदी महत्त्वाच्या बाबींची चौकशी अद्याप झालेली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सध्या असलेल्या अधिकाऱ्यांकडून काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, तसेच विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करून तपास जलदगतीने करावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच आरोपी फरार असल्यामुळे राजू कांबळे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच शस्त्र परवाना मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली. या प्रकरणात कलम ३०७ आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

दरम्यान, सात दिवसांच्या आत आरोपींना अटक न केल्यास यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात राज्य कमिटी सदस्य अविनाश भोसीकर, महाराष्ट्र नेते अहमद फारूक, इंजि. राज अटकोरे, शंकर महाजन, नगरसेवक प्रशांत इंगोले, नगरसेवक आकाश जोंधळे, के. येस. वने, दीपक मगर, बालाजी सावंत, रवि पंडित, विनोद वाघमारे, प्रकाश कोल्हे, मोहम्मद असलम, इंजी. रोहन पंडित, लंकेश आवटे, जयभीम डोंगरे, राष्ट्रपाल कोकरे यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: MaharashtranandedVanchit Bahujan Aghadi
Previous Post

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

Next Post

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home