Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

mosami kewat by mosami kewat
June 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसीलदार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने उमाताई जाधव, संतोष भोसले यांच्यासह विविध समाज प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. (Bhatke Vimukta Samaj)

Also Read : नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

बैठकीत पारनेर तालुक्यातील उदजिरा येथील मदारी समाजासंदर्भातील गंभीर प्रश्न मांडण्यात आला. संबंधित समाज परप्रांतीय असल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या वादाची सविस्तर माहिती प्रशासनासमोर मांडण्यात आली. या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दखल घेतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी अजित भोसले, राहुल भोसले, सुरेश काळे, सचिन काळे, रामसिंग भोसले, बशीर मदारी, रोशन मदारी, जकीर मदारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या मूलभूत प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले. भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. (Bhatke Vimukta Samaj)

Also Read : NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

तसेच आगामी काळात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीत शिक्षण, निवास, जातप्रमाणपत्र, ओळखपत्रे, शासकीय योजनांचा लाभ आणि समाजाच्या पुनर्वसनासंबंधी विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासन आणि समाज प्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: ahilyanagarBhatke Vimukta SamajMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

Next Post

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

Next Post
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प
बातमी

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

by mosami kewat
July 29, 2026
0

देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून येथे नंदा की चौकी परिसरात सुमारे १६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा...

Read moreDetails
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home