मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) स्वाक्षरी मोहिमेत (Sign Campaign) सक्रिय सहभाग घेतला. या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि मनुवादी विचारसरणीच्या लोकांना ही स्पष्ट चेतावणी दिली आहे की, “आमचा देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालेल, मनुस्मृतीनुसार नाही.”
संविधानाचे रक्षण करण्यासाठी, तसेच संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांचे समर्थक आणि वंचित बहुजन आघाडी सतत संघर्ष करत राहील.





