वंचित बहुजन आघाडी वर्धापन दिन पिंपरी चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय मा.खा.ऍड प्रकाश आंबेडकर लिखित ‘समकालीन राजकारण – आंबेडकरवादी आकलन’ हे पुस्तक आणि प्रबुद्ध भारत कॅलेंडर 2023 नागरिकांना वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सत्तेत निवडून आणायचे आहेत हेच ध्येय असल्याचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा.संजय ठोंबे मा.संतोष जोगदंड मा.प्रीतम कांबळे मा.रजनीकांत क्षिरसागर मा.अशोक खोपे मा.प्रमोद मगर , ब्रदर दिपकअण्णा चक्रनारायण आदी मान्यवर उपस्थित होते.
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...
Read moreDetails