Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

mosami kewat by mosami kewat
September 1, 2026
in Uncategorized
0
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
       

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. मतदार हा केवळ संख्या नाही; तो या देशाचा नागरिक आहे आणि मतदानाचा अधिकार हा त्याचा संवैधानिक अधिकार गोठवून टाकने गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे राजेंद्र पातोडे यांनी दिली.

हे मतदार कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने मृत, कायमचे स्थलांतरित, पत्त्यावर सापडले नाहीत, दुबार नोंदणी आणि ‘इतर’ अशी कारणे दिली आहेत. मात्र, एखादा नागरिक घरात सापडला नाही किंवा कामानिमित्त काही काळ दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणून त्याचे नाव मतदार यादीतून बाहेर ठेवणे योग्य नाही. महाराष्ट्रातील लाखो मजूर, विद्यार्थी आणि कामगार रोजगार व शिक्षणासाठी तात्पुरते स्थलांतर करतात. 

एखादा मतदार घरी सापडला नाही म्हणून त्याला मतदार म्हणूनच नाकारणे हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे.वंचित बहुजन आघाडीने वगळण्यात आलेल्या मतदारांची जिल्हानिहाय, मतदारसंघनिहाय आणि कारणनिहाय संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. विशेषत अनुपस्थित, स्थलांतरित आणि इतर या कारणांखाली वगळलेल्या प्रत्येक मतदाराची प्रक्रिया पारदर्शकपणे तपासली जावी, हे गरजेचे आहे.कारण ही केवळ मतदार यादीतील कपात नाही. 

यामागे गरीब, दलित, आदिवासी, भटके. विमुक्त, स्थलांतरित मजूर आणि इतर वंचित घटकांचा मतदानाचा अधिकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची क्षमता नाही, त्यांचा आवाज सहजपणे दाबला जाऊ नये.

ही मसुदा यादी असून दावे हरकतीची संधी असल्याचे सांगितले जात असले तरी, पात्र नागरिकाचे नाव आधी बाहेर ठेवायचे आणि नंतर त्यालाच स्वतःचा मतदानाचा अधिकार सिद्ध करण्यासाठी धावपळ करायला लावायची, ही प्रक्रिया न्याय्य नाही.

निवडणूक आयोगाने प्रत्येक वगळलेल्या मतदाराबाबत पारदर्शकता ठेवावी. आम्हाला केवळ आकडे नकोत, तर प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराची हमी हवी आहे. एका जरी पात्र मतदाराचा अधिकार अन्यायाने हिरावला गेला, तर वंचित बहुजन आघाडी त्याविरोधात ठामपणे संघर्ष करेल, असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला. 


       
Previous Post

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Next Post

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

Next Post
बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
बातमी

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने...

Read moreDetails
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

September 21, 2026
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

September 21, 2026
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home