Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

mosami kewat by mosami kewat
September 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग
       
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन काल सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाला गावातील सर्व समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बालमटाकळी गावात प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना पर्याय निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रथमच मोठ्या संख्येने तरुण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले. शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने गावातून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

शाखा उद्घाटनानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला ग्रामस्थांसह परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, कल्याणराव भागवत, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे पाटील, ऑगस्टीन गजभिव, रवींद्र निळं, बन्नू शेख, धोंडराम मासाळ, विष्णू वीर, लुकस गजभिव, प्रमोद गजभिव, लक्ष्मण मोरे, सलीम जिलानी, रज्जाक सय्यद, अरुण निळ, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुरेश घोक्षे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शाखेचे अध्यक्ष दारासिंग भोगळे, संतोष घोरपडे, सूर्यकांत भोगळे, अरुण भोंगळे, अशोक भोंगळे, संदेश खंडागळे, बंडूअण्णा शिंदे, अशोक वाघूबरे, भारत घोरपडे, संभाजी घोरपडे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

VBA Branch Inaugurated in Balamtakali; Large Participation of Youth from All Communities

Tags: ahmadnagarMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

Next Post

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post
आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home