पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहर शिष्टमंडळाने राष्ट्रीय सरचिटणीस अॅड. प्रियदर्शी तेलंग यांच्या नेतृत्वाखाली कात्रज येथील संत गुरु रविदास महाराज मंदिरात अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटना भारत राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखदेवजी महाराज यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, तेलंग आणि सुखदेवजी महाराज यांच्यात विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. सुखदेवजी महाराजांनी यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध व्यक्त केले, तसेच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संत रविदास मंदिरात दर्शन घेतले. या शिष्टमंडळात शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे, युवक अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट आघाडी पुणे शहर पश्चिमचे विशालभाऊ कसबे, पूर्व विभाग अध्यक्ष अजयभाऊ भालशंकर यांच्यासह अनेक शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...
Read moreDetails






