पुणे : भाजप सरकारने तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीने ठामपणे विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षांवरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून ट्विट करत म्हटले की, भाजप सरकारच्या तिसऱ्या भाषेच्या सक्ती करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा ठामपणे विरोध आहे.
त्यांनी शिवसेनेवर (उबाठा गट) जोरदार टीका केली, शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्ता उपभोगली, पण त्यांनी किती मराठी माणसांना कंत्राटे दिली, हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
भाजप आणि इतर प्रमुख पक्षांवर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले, भाजप सापनाथ आहे, तर हे नकली मराठीप्रेम दाखवणारे शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे प्रस्थापित पक्ष नागनाथ आहेत. शेवटी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, जेथे जेथे तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन केले जाईल, तेथे वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल.
पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप
पुणे : समाज कल्याण विभागाच्या पुणे येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर वंचित बहुजन युवा आघाडीने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरेगाव...
Read moreDetails