कोल्हापूर. दि ०१ मे २०२३ : बिंदू चौकात सुरु झालेली ही पदयात्रा शिवाजी रस्ता मार्गे शिवाजी चौक तिथून भाऊसिंगजी रस्त्याने महानगरपालिका मार्गे सीपीआर चौकात येऊन राजर्षी छत्रपती शाहु समाधी स्थळावर तिची सांगता झाली.वाढती महागाई , बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती .
या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला.
ही पदयात्रा शाहुमहाराज समाधी स्मारकावर पोहचण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी भाऊसिंगजी रस्त्यावर ज्या ठिकाणी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले त्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून या सांगता करण्यात आली. राज्य सरकार चुकीची धोरणे राबवून संविधान धोक्यात आणण्याचे काम करत आहे. जो काही छुपा अजेंडा राज्य सरकार राबवत आहे तो जनतेसमोर यावा अशी मागणी कोल्हापूरच्या प्रभारी डॉक्टर क्रांतीताई सावंत यांनी यावेळी केली.
राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन महागाई कमी करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात यैईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यांनी दिला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलींद पवार, पदयात्रेचे नेत्रुत्व डॅा. क्रांतीताई सावंत यांनी केले यावेळी कोल्हापूरचे निरीक्षक अतुल बहुले यावेळी उपस्थित होते .
कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा उत्साहात पडला पार
कोल्हापूरात भव्य पदयात्रा झाल्यानंतर राजश्री शाहू स्मारक येथे कोल्हापूर येथे जिल्हा अध्यक्ष ,युवक अध्यक्ष ,महीला आघाडी ,कामगार आघाडी ,तसेच विविध वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां च्या प्रमुख उपस्थित मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास मार्गदर्शन जिल्हा प्रभारी डॉ.क्रांती ताई सावंत व जिल्हा निरीक्षक अतुल बहुले यांनी केले .तसेच कार्यकर्त्यांचा विविध अडचणी जाणून घेतल्या .जिल्हा, तालुका कार्य कारनी व पदाधिकारी नेमणुका तसेच शाखा बांधणी व पक्ष संघटन वाढविण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्याचे यावेळी ठरवण्यात आले .तसेच पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत लवकरच जाहीर सभा आयोजित करण्याचा आग्रह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी व्यक्त केला .
तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा उत्तरचे महासचिव सिद्धार्थजी कांबळे यांनी आपल्य मनोगतात मत मांडले. शेवटी आभार कामगार युनियनच् जिल्हा प्रमुख संजयजी गुदघे यांनी माडले . सर्व विंगच्या प्रमुखांनी एक दिलाने काम करण्याचा व जिल्यामध्ये वंचित वाढवून येणार्या निवडणूकीमध्ये आपले उमेदवार निवडूण आणण्याचा निर्धार व्यक्त केला .