औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लिंबे जळगाव येथे बंद पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले. (Ashadhi Ekadashi 2025)
छोटे पंढरपूर येथे दिंडीतील वारकरी जात असताना, त्यांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,
तसेच नंदकुमार गाडेकर, सईद बाबा पठाण, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब त्रिभुवन, मधुकर त्रिभुवन, कृष्णा गाडेकर, आदित्य गाडेकर, करण गाडेकर, आयुष गाडेकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Ashadhi Ekadashi 2025)
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails