Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
       
वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली; मात्र मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी, वडवणी तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडला आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच ग्रामीण भागातील शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुका व जिल्ह्यातील तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे वडवणी तालुकाध्यक्ष विनोद काकडे, तालुका उपाध्यक्ष निखिल तांगडे, अविनाश साळवे, विकास डोंगरे, राजकुमार वाघमारे, राहुल डोंगरे, अविनाश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AgricultureCrop DamageFarmerMaharashtraMonsoonPoliticalrainVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

Next Post

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

Next Post
प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home