नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार मोहिमेला तेज मिळत असून, पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते सीताबर्डी येथे नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुजात आंबेडकर यांच्या नागपूर प्रचार दौऱ्याचा हा भाग असून, आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला चालना देण्यासाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान महापुरुषांना अभिवादन करून वंचितांच्या न्याय-हक्कांसाठी लढण्याचा आणि ज्यांना आजवर राजकीय सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून निवडणूक लढाईसाठी उत्साह व्यक्त केला.





