Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

mosami kewat by mosami kewat
June 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात
       
वसई-विरार : वंचित बहुजन महिला आघाडी (वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “घे भरारी तुझ्या स्वप्नांची…” या शैक्षणिक व मार्गदर्शनपर उपक्रमाचा पाचवा वर्धापनदिन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शनिवारी (७ जून) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून करिअर कौन्सिलर व अब्रॉड एज्युकेशन कन्सल्टंट मनाली महेश राऊत उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच विविध क्षेत्रांतील करिअरच्या वाटांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक नियोजनासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. यावेळी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ तथा बहुराष्ट्रीय कंपनीचे आयटी मॅनेजर महेश राऊत यांनी कार्यक्रमाला भेट देऊन महिला आघाडीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सामाजिक क्षेत्रातील दिलीप जाधव आणि शिरसाट साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

हा कार्यक्रम महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा भोसले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन महिला पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महासचिव साक्षी जाधव, छाया लोखंडे, कोषाध्यक्ष सरिता बिंद, सचिव कोमल पटणे, दिपाली जाधव, उपसंपर्कप्रमुख प्रियंका तिवारी, विरार शहर अध्यक्षा सारिका सकपाळ, रमाताई काटे, वैशाली शिर्के, विद्या पाटील, रोशनी गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan AaghadiVasai Virar
Previous Post

भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

Next Post

इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

Next Post
इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home