Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

mosami kewat by mosami kewat
June 8, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

भारतीय रणरागिणींची ऐतिहासिक झेप! बांगलादेशचा ३-१ ने पराभव करत ७ वर्षांनंतर सॅफ चॅम्पियनशिपवर भारताचे नाव

मडगाव (गोवा) : भारतीय महिला फुटबॉल संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप (SAFF Women’s Championship) मध्ये शानदार कामगिरी करत तब्बल सात वर्षांनंतर विजेतेपदावर आपले नाव कोरले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या बांगलादेशचा 3-1 अशा फरकाने पराभव करत विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले.

गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या अंतिम लढतीत भारताकडून प्यारी जाख्सा, सनफिदा नोंगरुम आणि लिंडा कोम सेर्तो यांनी प्रत्येकी एक गोल केला. बांगलादेशकडून रितु पोर्णा हिने एकमेव गोल केला. सामन्याच्या 42व्या मिनिटाला प्यारी जाख्साने भारताचे खाते उघडले. मात्र पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत रितु पोर्णाने गोल करत बांगलादेशला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. दुसऱ्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ कायम ठेवत 50व्या मिनिटाच्या सुमारास सनफिदा नोंगरुमच्या अचूक हेडरमुळे पुन्हा आघाडी घेतली. (SAFF Womens Championship 2026)

Also Read : मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

यानंतर भारतीय संघाने खेळावर वर्चस्व राखले. सामन्याच्या 82व्या मिनिटाला लिंडा कोम सेर्तोने प्रतिस्पर्धी बचावफळीच्या चुकीचा फायदा घेत चेंडू जाळ्यात धाडला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अप्रतिम सातत्य दाखवले. भारताने खेळलेले चारही सामने जिंकत एकूण 18 गोल केले, तर केवळ एकच गोल स्वीकारला. दुसरीकडे, सलग तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे बांगलादेशचे स्वप्न भारतीय संघाने धुळीस मिळवले.

पुरस्कारांमध्येही भारतीय खेळाडूंची चमक

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्येही भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. अवेका सिंह हिने चार गोलांसह सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला. सनफिदा नोंगरुम हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (Most Valuable Player) म्हणून गौरवण्यात आले, तर पंथोई चानू एलांगबाम हिने सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार पटकावला. नेपाळच्या संघाला फेअर प्ले पुरस्कार प्रदान करण्यात आला. (SAFF Womens Championship 2026)

Tags: FootballGoaIndia vs BangladeshIndia wins SAFF Women's ChampionshipSAFF Womens Championship 2026women Championship
Previous Post

मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

Next Post

वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

Next Post
वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

वसई-विरार: वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; 'घे भरारी तुझ्या स्वप्नांची' उपक्रमाचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home