Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 
       
वसई : वसई येथील रिक्षा चालकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियन’ च्या नवीन फलकाचे अनावरण रविवारी (दि. १५) वसई स्टेशन येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या नवीन कमिटीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी बबन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते, प्रदेश संघटक सुनील लोखंडे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ तायडे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे, शैलेश पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र कोषाध्यक्ष विद्याधन सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने आणि क्षेत्र उपाध्यक्ष अक्षय गुजर यांच्या सहकार्याने या संघटनेची बांधणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रिक्षा चालकांच्या कष्टाला सन्मान मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणींच्या काळात संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहील.

या कार्यक्रमाला वसई-विरारचे विविध पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये संजय पवार (क्षेत्राध्यक्ष, व.वि.म.न.पा), रणजीत सोनवणे (वसई तालुका अध्यक्ष), भरत मोरे (तालुका उपाध्यक्ष), बुद्धभूषण सावळे (वसई शहर उमेदवार), प्रेरणा भेकरे (क्षेत्र उपाध्यक्ष), विठ्ठल गायकवाड व अविनाश रंधवे, तसेच मिरा-भाईंदरमधून सचिन तायडे (कार्याध्यक्ष, भाईंदर प.), अनवर खान, दीपक लाहाने, गुड्डू, आनंद, अमोल घोंगडे आणि अमर मस्के या समाजसेवकांनीही उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan AaghadiVasaivbaforindiaVirar
Previous Post

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

Next Post
मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!
बातमी

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

by mosami kewat
March 30, 2026
0

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यानंतर, आज दुपारी पुण्यात हवामानाने अचानक कूस बदलली. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या...

Read moreDetails
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026
यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

March 30, 2026
आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 

आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 

March 30, 2026
अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home