Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिक : वणी येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू; वंचितच्या पाठपुराव्याला अखेर यश

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नाशिक : वणी येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू; वंचितच्या पाठपुराव्याला अखेर यश
       

नाशिक (ता. दिंडोरी) : वणी येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, वंचित बहुजन आघाडी व स्थानिक विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. साधारणतः २०१३ पासून ग्रामसभेत हा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात होता.

गावात सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका नसल्याने वणीसह परिसरातील विद्यार्थ्यांना दिंडोरी व नाशिक येथे जावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील काही विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतील रिकाम्या खोल्यांमध्ये अभ्यास करत होते. मर्यादित सुविधांमध्येही त्यांनी सकारात्मक यश संपादन केले; मात्र योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास यशाचा टक्का अधिक वाढेल, तसेच प्रवासाचा वेळ व खर्च वाचेल, या उद्देशाने अभ्यासिकेची मागणी सातत्याने पुढे रेटण्यात आली. (Nashik news)

मागील ग्रामसभेत हा विषय पुन्हा चर्चेस आला असता वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव संविधान गांगुर्डे यांच्यासह विशाल गांगुर्डे, विकी दुर्धवळे, संकेत गांगुर्डे, सिद्धेश बागुल आदी कार्यकर्त्यांनी याचा सखोल पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायत, वणी यांच्या माध्यमातून अभ्यासिका उभारण्यात आली.

या नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे नामकरण ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ असे करण्यात आले आहे. स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या व भारतीय शिक्षणक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन म्हणून हे नाव देण्यात आले आहे. (Nashik news)

उद्घाटन प्रसंगी बोलताना संविधान गांगुर्डे यांनी सांगितले की, “सध्या वणीतील सुमारे ५० विद्यार्थी पोलीस भरतीची परीक्षा देऊन आले आहेत. हा त्यांच्या अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नव्याने सुरू झालेल्या या अभ्यासिकेमुळे आगामी भरती प्रक्रियेत निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.”

या अभ्यासिकेचे उद्घाटन सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड तसेच महेंद्र पारख, राकेश थोरात, राहुल गांगुर्डे, कैलास धूम आदी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, गणेश देशमुख, रविकुमार सोनवणे, दिगंबर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. (Nashik news)

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह दिनेश पवार, शुभम पवार, रोहन बोरसे, नयन दुर्धवळे आणि रिया मोरे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अभ्यासिका सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


       
Tags: MaharashtranashikstudentVanchit Bahujan AaghadiVani Inaugurates ‘Gyanjyoti Savitribai Phule’ Studyvbaforindia
Previous Post

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

Next Post

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Next Post
Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 
बातमी

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

by mosami kewat
April 12, 2026
0

पुणे : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज मुंबई येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना...

Read moreDetails
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home