Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 15, 2022
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण !
0
SHARES
272
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

आयुक्तांच्या गैरहजेरीत लहान मुलांच्या हस्ते सहाय्यक आयुक्तांना निवेदन

पुणे – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे येथे आज सकाळी आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परदेशी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे बाबत अशा विविध प्रश्नांवर, इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आरक्षणाच्या आराखड्याप्रमाणे काटेकोर पालन करून करण्यात याव्या, यासह विविध विद्यार्थी प्रश्नांवर वंचित बहुजन युवा आघाडी समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी भव्य आंदोलन करण्यात आले.

समाज कल्याण आयुक्तांना पूर्वकल्पना देऊन ही ते आज गैरहजर होते, त्याचा निषेध म्हणून आंदोलकांनी लहान मुलांच्या हस्ते सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. तसेच समाज कल्याण आयुक्तालयाचे नाव बदलून “सामाजिक अन्याय विभाग, इथे अन्याय करून मिळेल” असे बॅनर आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकवले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, वंचितचे राज्याचे नेते अनिल जाधव, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, अफरोज मुल्ला, विशाल गवळी, ऋषीकेश नांगरे पाटील महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अनिता चव्हाण व शहर व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते


       
Tags: BARTIMaharashtraPrakash AmbedkarsamajkalyanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

गोष्टीच्या पलीकडे

Next Post

पंतप्रधानांच्या भाषणातील घराणेशाही आणि घराणेदार भाजप

Next Post
पंतप्रधानांच्या भाषणातील घराणेशाही आणि घराणेदार भाजप

पंतप्रधानांच्या भाषणातील घराणेशाही आणि घराणेदार भाजप

मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार ...

June 28, 2025
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎
बातमी

राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

लातूर- देशाचा सुजान नागरिक घडवायचा असेल तर आज धम्माची गरज आहे. जगाची प्रगती ही धम्म विचाराने झाली आहे. जगात जे ...

June 28, 2025
आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास
बातमी

आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास

मुंबई - डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या जगात सायबर सुरक्षेचे धोके किती गंभीर असू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क