Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

mosami kewat by mosami kewat
June 28, 2025
in बातमी, राजकीय
0
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

       

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘बौद्धांनो वाचा आणि विचार करा, बौद्धांसोबत कोण आहे?’ या आशयाचे पोस्टर बुद्ध विहाराजवळ लावण्यात आले असून, या पोस्टरने लक्ष वेधून घेतले आहे. ‎

‎यावेळी स्थानिक नागरिक बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनीही ‘महाबोधी महाविहार’ आंदोलनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी बोधगया येथील महाबोधी विहाराला भेट दिली होती, मात्र तिथे सुरू असलेल्या आंदोलनास्थळी ते आले नाहीत, तसेच त्यांनी याबाबत भाष्य केले नाही, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ‎

‎या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांचा सहभाग असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले. नेते बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला असून, भीमराव आंबेडकरांनी दोनवेळा आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात आंबेडकर कुटुंबाने आंदोलनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याची ग्वाही दिली आहे. ‎ ‎

नागरिकांचा संताप आणि इशारा

राजकीय नेत्यांच्या या उदासीनतेवर बौद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “जर तुम्ही आमच्या ‘महाबोधी बुद्ध विहारासाठी’ बोलू शकत नसाल, तर तुमचा चपलांचा हार घालून स्वागत करु, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. ‎ जे लोक आपल्या अस्मितेसाठी आणि नेत्यांसाठी आवाज उठवू शकत नाहीत, तसेच महाविहाराबद्दल बोलत नाहीत, अशा लोकांना समाजात स्थान नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि भाजपच्या “दलाल लोकांना” स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे ते समाजात येत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही.


       
Tags: Buddhist communityMahabodhi Viharmumbaipoliticsprotestvbaforindia
Previous Post

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

Next Post

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Next Post
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home