Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

mosami kewat by mosami kewat
June 28, 2025
in बातमी
0
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालकांनी शेळके यांना बेदम मारहाण करून रात्रभर घरात डांबून ठेवल्याचा आणि त्यांची रिक्षाही जप्त केल्याचा आरोप आहे. (Dombivli)

या घटनेनंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन केल्यानंतर सात तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मोठागाव येथे एका कारची आणि रिक्षाची धडक झाली. या धडकेनंतर कार चालकांनी रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना मारहाण केली.

एवढेच नाही तर, त्यांना रात्रभर एका घरात डांबून ठेवल्याचा आणि त्यांची रिक्षाही जप्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंजाजी शेळके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेळके यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Dombivli)

या घटनेला कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखा कुरवारे, डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा महासचिव राजू खरात यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली.

या आंदोलनानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत सात तासांनी संबंधित कार चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.

Tags: crimeDombivliprotestvbaforindia
Previous Post

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

Next Post

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home