Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरएसएसमध्ये खळबळ! मोहन भागवत घाबरले; ‘वंबआ’ चे निवेदन स्वीकारण्यास नकार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 19, 2023
in बातमी
0
आरएसएसमध्ये खळबळ! मोहन भागवत घाबरले; ‘वंबआ’ चे निवेदन स्वीकारण्यास नकार !
       

स्वीय साहाय्यकाने स्वीकारले निवेदन, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात

अकोला – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा तिरंगा आणि संविधान नाकारत आली आहे. संघाचा अजेंडा हा हिंदू राष्ट्र आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो. त्यांनीही देशात अराजकता निर्माण केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदू राष्ट्राचा हट्ट सोडत संविधानाच्या आधारावर देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अकोला येथे दिले. संघाच्या नेत्यांना थेट अशा प्रकारचे निवेदन देण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे संघात खळबळ माजली आहे. घाबरलेल्या मोहन भागवत यांनी मी निवेदन स्वीकारत नसल्याचे पोलिसांमार्फत सांगितले.

वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात असल्याची माहिती मिळताच मोहन भागवत यांनी नकार दिला मात्र, त्यांच्या स्वीय साहाय्यकाने ते निवेदन स्वीकारले. या निवेदनात वंचित बहुजन आघाडीकडून थेट आरएसएसवर हल्ला करण्यात आला आहे. संघाची विचारधारा देशाला वाचवणारी नसून भारतीय राज्यघटनेनुसार या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, असं सांगण्यात आले आहे.

मोहन भागवत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना निवेदन देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्रीच जाहीर केलं होतं. वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्री निवदेन देणार असल्याची घोषणा करताना अकोला जिल्हा पोलिस विभाग कामाला लागला. मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सशस्त्र सुरक्षा आहेत. त्यामुळं त्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी शनिवारपासूनच वंचितच्या पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातही याबद्दल चर्चा होती.

पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंड भीरड, पश्चिम अकोल्याचे कार्याध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, अॅड. संतोष राहटे, पूर्व अकोल्याचे अध्यक्ष शंकर इंगळे, आदिवासी समाजाच्या नासरी चव्हाण यांना गाठत त्यांना थांबविले व ताब्यात घेतले.


       
Tags: rssvba
Previous Post

छ. शिवाजी पार्क मैदानावर ‘वंचित’ची ‘संविधान सन्मान महासभा’!

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी विजयासाठी वंचित पदाधिका-यानी बनवला रोडमॅप.

Next Post
लोकसभा निवडणुकीसाठी विजयासाठी वंचित पदाधिका-यानी बनवला रोडमॅप.

लोकसभा निवडणुकीसाठी विजयासाठी वंचित पदाधिका-यानी बनवला रोडमॅप.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
बातमी

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

by mosami kewat
July 5, 2025
0

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...

Read moreDetails
अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

July 5, 2025
समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

July 5, 2025
कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

July 5, 2025
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

July 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क