रावेर – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रावेर तालुक्यात दिनांक 13 नोव्हेंबर रोजी खिरवळ, पातोंडी, थेरोळे, रायपूर या गावांमध्ये शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची घरे वाचवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य शमीभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गावोगावी जाऊन अधिक्रमणधारकांना मोलाचे मार्गदर्शन करून मोर्चामध्ये येण्याचे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या नियोजनानुसार रावेर तालुक्यातील वंचितचे सर्व पदाधिकारी मोर्चाच्या तयारीला लागले आहे. याप्रसंगी जिल्ह्याचे महासचिव दिनेश भाऊ इखारे, उपाध्यक्ष रफिक बेग, संघटक शेख याकूब शेख नसीर, कांतीलाल गाढे, राजेंद्र अवसरमल ज्ञानेश्वर तायडे, सुरेश अटकळे, कंदर सिंग बारेला, दौलत अडांगळे, नितीन अवसरमल, अर्जुन वाघ, संदीप सवरणे, राहुल गाढे, मनोज सवरणे, प्रतीक दामोदर, सुमित सवरणे, अजय भालेराव, कुलदीप तायडे, अजय तायडे ज्ञानेश्वर कोळी , गणेश सपकाळे, कैलास कोळी, मेहता तडवी, नरेंद्र करवले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.