Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2024
in राजकीय
0
‘वंचित’चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये,असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत ते निर्णय घेतील. त्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी नाहीये. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काल झालेल्या बैठकीत त्यांनी काही मुद्दे मांडले एक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले आणि तीन काळया कृषी कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट करावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

२ फेब्रुवारीच्या तारखेच्या बैठकीत आम्ही दिलेला जो अजेंडा आहे तो आणि त्याच्याबरोबर जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला २ तारखेपर्यंत तयार होईल असे आम्ही मानतो. त्याचा मसुदा आम्हाला दिला, तर संयुक्तरित्या चर्चा करायची की, एक-एक पक्षासोबत चर्चा करायची हा निर्णय त्या बैठकीत होईल.

आम्ही बैठकीत खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिले आहे, त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की, नाना पटोले यांना कोणाला सहभागी करून द्यायचे अधिकार दिले आहेत किंवा नाही दिले आहेत याची स्पष्टता आम्ही काँग्रेसला मागत आहोत. नाही, तर नाना पटोले एक करतील आणि काँग्रेस दुसरं काही करेल यात खूप अंतर होईल. असे त्यांनी म्हटले आहे. कारण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले होते की, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आघाडीच्या निर्णयाचे अधिकार दिले असल्याचे सांगितले होते. कालची ती सही त्यांची व्यक्तिगत असेल

महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजप सरकार येणार नाही, यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. आम्ही अगोदरपासून सांगत आहोत की, हे देशातील भाजपचे सरकार देशाला धोकादायक आहे, म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय. आपला इगो सोडून आरएसएस-भाजपाचे सरकार न येणे यासाठी आमची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


       
Tags: AkolaCongressmahavikasaghadiNana PatolePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘मविआ’ चे वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेतल्याचे पत्र !

Next Post

नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर

Next Post
नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर

नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? - प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
बातमी

जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

by mosami kewat
August 31, 2025
0

‎‎जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके...

Read moreDetails
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

August 31, 2025
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

August 31, 2025
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 31, 2025
भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

August 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home