पूर्णा : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने रुंज फाटा येथे आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे आणि युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी केले. सरकारच्या धोरणांवर टीका करत शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला आणि ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.
यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलन शांततेत पार पडले.
मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांनी आपला उमेदवारी...
Read moreDetails






