औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, एकनिष्ठ सेवक आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या शूर वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी, औरंगाबाद तर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या अमर म्हणीतून राष्ट्रीय एकात्मतेचा, निष्ठेचा आणि बलिदानाचा संदेश देणाऱ्या जिवाजी महाले यांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण केले.
या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड, जिल्हा महासचिव सतीश भाऊ शिंदे, युवा शहराध्यक्ष संदीप भाऊ जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम भाई, युवा नेते सचिन गायकवाड, अमोल बोर्डे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.