नाशिक : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक तालुका यांच्या वतीने त्रिरश्मी बौद्ध लेणी, पाथर्डी फाटा नाशिक, येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभागाने सहकार्य केले.
या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सागर रिपोटे, दीपक भंडारी, अरुण शेजवळ, युवक महानगर महासचिव दीपक पगारे, उपाध्यक्ष युवराज मनेरे व अमोल चंद्रमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे व तालुका महासचिव संतोष वाघ यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सामाजिक, मानवतावादी आणि बौद्ध मूल्यांवर आधारित महत्त्व लक्षात घेऊन रक्तदान या मानवसेवेच्या कार्यातून समाजात बंधुता आणि करुणेचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.