Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीचे अनोखे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
July 17, 2025
in बातमी
0
मुंबईतील खड्डेमय रस्त्यांविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीचे अनोखे आंदोलन

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीचे अनोखे आंदोलन

मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आज (१७ जुलै २०२५) वंचित बहुजन महिला आघाडीने भांडुप येथे एस विभाग महापालिकेच्या लगतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये हार, फुले आणि ‘बीएमसी’ (बृहन्मुंबई महानगरपालिका) नावाच्या होड्या सोडून अनोखे आंदोलन केले. हे खड्डे केवळ भांडुपमध्येच नसून संपूर्ण मुंबईभर पसरले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
‎
‎आजचे हे आंदोलन वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी महिला आघाडीच्या मुंबई सदस्य काजल वानखेडे, रंजना कांबळे, कमल गायकवाड, सीमा इंगळे, राजकन्या सरदार, कविता गायकवाड, भारती मोरे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‎
‎आंदोलकांनी महानगरपालिकेला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर येत्या महिन्याभरात हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले नाही, तर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यांमध्ये घालण्याचे काम वंचित बहुजन महिला आघाडी करेल, असा इशारा स्नेहल सोहनी यांनी दिला.
‎
‎मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा हा नागरिकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांमध्ये भर पडते. वंचित बहुजन महिला आघाडीने पुकारलेल्या या आंदोलनामुळे आता तरी महानगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी ठोस पावले उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Tags: mumbaiprotestvbaforindia
Previous Post

जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

Next Post

रासायनिक खतांच्या (युरिया) तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप
बातमी

बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

by mosami kewat
August 28, 2025
0

‎अमरावती : बुद्धगया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेने पाठिंबा...

Read moreDetails
डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

August 28, 2025
मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

August 28, 2025
अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

August 28, 2025
वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

August 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home