लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी जेष्ठ नेते वसंतदादा साळवे, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, युवा अध्यक्ष सागर आल्हाट यांनी आपली मनोगते व्यक्त करत अण्णाभाऊंच्या विचारांचा वर्तमान काळातला संदर्भ स्पष्ट केला. कार्यक्रमास माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, अजय भालशंकर, ॲड. किरण कदम, माजी विश्वास गदादे, रवींद्र गायकवाड, शाम गोरे, गौतम ललकारे, संदीप चौधरी, नागेश भोसले, बी. पी. सावळे, भेगडे पाटील, बिपीन लोंढे, सतीश साबळे, नितीन कांबळे, सतीश रणवरे, माणिक लोंढे, परमेश्वर सनादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष दीपक ओहोळ यांनी केले. अण्णाभाऊंच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.